पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या गृहकर्जावर भरघोस सूट

ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर पेलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेत तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिले घर खरेदी करणाऱयाला 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.4 लाखांचा फायदा होणार आहे.
या योजनेनुसार, जर वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयापर्यंत असेल तर तुम्ही पहिल्या घरखेदीसाठी घेणार असलेल्या गृहकर्जातील सहा लाख रूपयांसाठी तुम्हाला 6.5 टक्कयांची सवलत मिळेल. गृहकर्जाची रक्कम कितीही असली तरी उतपन्नावर होमलोनमधील पहिल्या सहा लाखांवर 6.5 टक्कयांची सवलत मिळेल. म्हणजे गृहकर्जाचा व्याज दर 9 टक्के असेल तर पहिल्या सहा लाखांवर फक्त 2.5 टक्के व्याज भरावे लागणार आहे. गृहकर्जाच्या उर्वरीत रकमेवर मात्र 9 टक्कयांप्रमाणे व्याज असेल.