|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘टोल’धाडीला जिल्हाधिकाऱयांनी दिला ‘स्थगिती’चा सिग्नल

‘टोल’धाडीला जिल्हाधिकाऱयांनी दिला ‘स्थगिती’चा सिग्नल 

प्रतिनिधी / सातारा

जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल हे चुकीच्या बाबींचा लगेच बंदोबस्त करतात. त्यावर कितीही दडपण येवू द्या. महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये असाच प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. तो म्हणजे ‘टोल’धाड. टोलचा झोल केवळ मर्जीतील ठेकेदारांच्या हातावर सोपवला जातो.

याबाबतची तक्रार शिवसेनेचे सातारचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी करताच, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी टोलच्या झोलला स्थगितीचा सिग्नल लागला आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे देशविदेशातून पर्यटक महाबळेश्वरात येतात. महाबळेश्वर पालिकेतर्फे प्रदुषणकर व प्रवासीकर वसुलीचा ठेक्याची प्रक्रिया दरवर्षी काढली जाते. याही वर्षी 20 ऑक्टोबर 2016 रोजी प्रक्रिया राबवण्यात आली होती. 3 वर्षासाठी नामांकित ठेकेदारांकडून ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्या होत्या. याला पहिल्या वर्षी प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे दुसऱयांवेळी जाहिर निविदा प्रसिद्ध केली.

 ठेकेदाराला कागदपत्राचे निमित्त साधून ठेक्यापासून ठेवले वंचित

यावेळी त्यावेळचे ठेकेदार चंद्रकांत जाधव यांनी 3 कोटी 84 लाख 24 हजार 375 रुपये, नागपुरचे ठेकेदार खळदकर कन्स्ट्रक्शन 3 कोटी 41 लाख 7 हजार 562 व पुणेचे मोमीन एंटरप्रायझेस 3 कोटी 79 लाख 65 हजार 180 रक्कमेच्या निविदा भरल्या होत्या. अनामत रक्कमही भरली होती. त्यानंतर हा ठेका जाणिवपूर्वक जास्त बोली करणाऱया ठेकेदाराला कागदपत्राचे निमित्त साधून ठेक्यापासून वंचित ठेवले. ही बाब अन्यायकारक ठरली. तसेच ही बाब सातारा नगर पालिकेचेही नुकसान करणारी अशीच होती, म्हणूनच याबाबत जाधव यांनी तक्रार केली होती.

 

जिल्हाधिकाऱयांचे नागरिकांकडून कौतुक

याबाबत करठेका वसुलीचे ठेकेदार चंद्रकांत जाधव, सलिम बागवान, सुनील साळुंखे व महाबळेश्वरच्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली. त्यांना या प्रश्नांबाबत पुरावेही दिले. जिल्हाधिकारी मुद्गल यांनी या प्रकाराची माहिती घेऊन तात्काळ या प्रक्रियेवर स्थगिती आणली. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे महाबळेश्वर येथील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related posts: