|Friday, July 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘कंग फू योगा’ चित्रपटाने केली तब्बल 1000 कोटींची कमाई

‘कंग फू योगा’ चित्रपटाने केली तब्बल 1000 कोटींची कमाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, दिशा पटानी आणि जॅकी चॅन यांच्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली नसली तरी चीनमध्ये या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाने चीनमध्ये जवळपास 179

मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय मुल्यात 1200 कोटी इतकी कमाई कमाई केली आहे. भारतात आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाने इतकी कमाई केली नाही.

जॅकी चॅनने स्वतःभारतात येऊन या चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. तरीही ‘कुंग फू योगा’ या चित्रपटाने भारतात केवळ चार कोटींची कमाई केली. भलेही हा चित्रपट भारतात चालला नाही तरी ‘दबंग’मध्ये सलमानसोबत काम करणार सोनू निदान आपण 1000 कोटीच्या क्लबमध्ये गेलो या विचारानेच सुखावला असेल चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रिया पाहून सोनू खूप खूश झाला आहे.