|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » गृहमंत्रालयाची वेबसाईट हॅक, चौकशीचे आदेश

गृहमंत्रालयाची वेबसाईट हॅक, चौकशीचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गृहमंत्रालयाची वेबसाइटच हॅक करण्यात आली. खुद्द गृहमंत्रालयाचीच वेबसाइट हॅक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक बाब लक्षात येताच चौकशीचे आदेश देण्यात आले.

गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट mha.nic.in आज सकाळी हॅक करण्यात आली. साइट हॅक झाल्याचे लक्षात येताच नॅशनल इंफॉर्मेटिक सेंटरने ही साइट तात्काळ बंद केली. या वेबसाइटला व्हिजिट दिल्यास ‘धिस वेबसाइट कांट बी रीच्ड’ असा संदेश येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात भारतावर होणाऱया सायबर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. जानेवारीमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डची वेबसाइट हॅक झाली होती. त्यानंतर आज गृहमंत्रालयाची वेबसाइट हॅक झाली. ही बाब लक्षात येताच चौकशीचे आदेश देण्यात आले.