|Monday, June 17, 2019
You are here: Home » leadingnews » मी कोणालाही घाबरत नाही : शशिकला

मी कोणालाही घाबरत नाही : शशिकला 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

काही लोक पक्षाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मी असे कदापि होऊ देणार नाही, मी कोणालाही घाबरत नाही, असे वक्तव्य अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांनी केले.

चेन्नई येथील पोज गार्डन येथे समर्थकांना संबोधित करताना शशिकला बोलत होत्या. शशिकला म्हणाल्या, मागील 33 वर्षांमध्ये पन्नीरसेल्वम यांच्यासारखे हजारो लोक पाहिले आहेत. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, त्यावेळी मी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. मी तेव्हा ही जबाबदारी नाकारल्यानेच पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.