|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जि.प.साठी 268 तर प.स.साठी 462 उमेदवार रिंगणात

जि.प.साठी 268 तर प.स.साठी 462 उमेदवार रिंगणात 

सोलापूर / प्रतिनिधी

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचे आज चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या 66 जागेसाठी तब्बल 268 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर पंचायत समितीच्या 130 जागेसाठी तब्बल 462 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक जागा बिनविरोध होऊन भाजपाने आपले खाते उघडले आहे. तर जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या सहा मतदार इच्छूक उमेदवार न्यायालयात गेल्याने येथील चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषदेच्या एकून 68 जागेसाठी 581 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 313 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे 66 जागेसाठी तब्बल 268 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर माळशिरस तालुक्यातील वेळापूर आणि उत्तर सोलापूर जिल्हय़ातील नानज गटातील इच्छूक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने येथील प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

जिल्हय़ातील 11 तालुक्य़ात पंचायत समितीच्या 136 जागा आहेत. पण, यापैकी माळशिरस तालुक्यातील झांबुड, अक्कलकोट तालुक्यातील मुगळी, हिरवड आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप, भंडार कवठे आणि निबंरर्गी या सहा मतमदार संघातील इच्छूक उमेदवार न्यायालयात गेल्याने 130 मतदार संघातील अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील 130 मतदार संघात एक हजार 125 उमेदवारी अर्ज वैद्य ठरले होते.  आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 663 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यामुळे 462 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी सर्वाधिक उमेदवार हे माळशिरस तालुक्यातून निवडणूकीसाठी रिंगणात उतरले आहे. या तालुक्यातील 11 जागेसाठी 41, करमळा तालुक्यातील पाच जागेसाठी 21, माढा सात जागेसाठी 27, बार्शी सहा जागेसाठी 21, उत्तर सोलापूर दोन जागेसाठी सहा, मोहळ सहा जागेसाठी 29, पंढरपूर आठ जागेसाठी 20, सांगोला सात जागेसाठी 33, मंगळवेढा चार जागेसाठी 17, दक्षिण सोलापूर सहा जागेसाठी 33, अक्कलकोट सहा जागेसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 130 जागेपैक करमळा तालुक्यातून 10 जागेसाठी 35, माढा 14 जागेसाठी 43, बार्शि 12 जागेसाठी 34, उत्तर सोलपूर चार जागेसाठी 20, माहोळ 12 जागेसाठी 48, पंढरपूर 16 जागेसाठी 51, सांगोला 14जागेसाठी 37, मंगळवेढा आठ जागेसाठी 38 दक्षिण सोलापूर 12 जागेसाठी 42, अक्कलकोट 12 जागेसाठी 34 आणि माळशिरस तालुक्यातून 22 जागेसाठी 80 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

भाजपाची विजयी सलामी

जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यत आपले खाते उघडले नव्हते. पण, पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे उमेदवार गणेश अंकुशराव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.