|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » स्पाइसजेटला मिळाले नवे ‘रेड-हॉट-स्पायसी’ रुप

स्पाइसजेटला मिळाले नवे ‘रेड-हॉट-स्पायसी’ रुप 

वृत्तसंस्था/ गुडगाव

स्पाइसजेट हवाई सेवा कंपनीने आपले रूप बदलायचे ठरवले असून, अधिक लाल रंगातील, कडक आणि खुसखुशीत गणवेश सादर केले आहेत. हे गणवेश हवाई कंपनीच्या लाल रंगाचे प्रतिनिधित्व करते. अनोख्या स्वरूपात आणि शोभिवंत रचनेचा धैर्य आणि स्टाइलमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. विमान कंपनीच्या रेड.हॉट.स्पायसी रुपडय़ापासून प्रेरणा घेऊन, सळसळतं तारुण्य आणि सुरेखता कायम राखत ग्लॅमर आणि स्टाइलमध्ये वाढ करण्यासाठी नव्या श्रेणीतील गणवेश सादर केले आहेत.

प्रत्येक विभागासाठी नव्या श्रेणीत अनोख्या रचनांचा समावेश आहे. विविध मोसम आणि उन्हाळा, थंडी इत्यादी कालावधींसाठी विशेष स्टाइल करण्यात आली आहे. केबिन क्रूसाठी सुंदर अशा रंगांची योजना सादर करण्यात आली आहे. यात कंपनीचे तरुण व्यक्तिमत्व सादर करणारे लाल आणि काळा असे उष्ण रंग सादर करण्यात आले आहेत.

“प्रवासाच्या वेळी किंवा ग्राउंड स्तरावर आपल्या डोळय़ांना जे दिसते त्याचा अनुभव उत्तम असणे गरजेचे आहे. गणवेशाची ही नवी श्रेणी स्पाइसजेटची ब्रँड व्हॅल्यू अधिक वाढावी यासाठी तयार करण्यात आली आहे, अधिक समकालीन आणि जागतिक पातळीवरील असे गणवेशाचे रुपडे असेल. सौंदर्यप्रधान दृष्टीबरोबरच हा गणवेश वापरणाऱयांसाठी तो अधिक सोईचा असेल, तसेच त्याचा दर्जा उत्तम असेल याची खात्री करून घेण्यात आली आहे,’’ असे स्पाइसजेटचे सीएमओ देबोजो महषी म्हणाले.