|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » पलानीस्वामी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल

पलानीस्वामी यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

तामिळनाडूचे विधीमंडळ नेते पलानीस्वामी आणि अण्णा दमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सत्ता स्थापनेचा दावा करणाऱया शशिकला यांनी आपले समर्थक आमदार फुटू नये आणि यातील आमदार पनीरसेल्वम यांच्या गटात सामील होऊ नये, यासाठी त्यांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर हॉटेलमधून पळ काढलेले आमदार सर्वनन यांनी सांगितले, मी वेष बदलून, भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. तिथे 118 आमदार माझ्या भरवशावर आहेत.

शशिकला आणि पलानीस्वामी यांनी आम्हाला ओलीस ठेवले होते, असा आरोप सर्वनन यांनी केला. या आरोपावरुनच शशिकला आणि पलानीस्वामी या दोघांविरोधात कुवाथूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.