|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजूचा विकास म्हणजे परळी खोऱयाचा विकास काय?

राजूचा विकास म्हणजे परळी खोऱयाचा विकास काय? 

प्रतिनिधी/ सातारा

आम्ही सत्तेपेक्षा सत्याला आणि सामान्य जनतेला महत्व देत आलो आहे. आजपर्यंत जे झाले ते झाले परंतु ज्याच्याकडे सायकल नव्हती त्याच्याकडे, गाडय़ा-घोडी आली कुठुन याची चौकशी लावली जाईल. उरमोडीच्या धरणाजवळ असलेल्या अनाधिकृत क्रशर आणि बंगला उद्ध्वस्त करण्याचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात येईल. दहशत-दहशत म्हणून प्रचार करणाऱयांना दहशत आणि दादागिरी काय असते ते दाखवुन दिले जाईल. एका बाजुला भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने गलेलठ्ठ झालेले विरोधक उमेदवार आणि दुसऱया बाजुला सातारा विकास आघाडीचे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत. याचा विचार करुन, आपण कारी गटातील आणि कारी व गणातील सातारा विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडुन द्यावे, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी परळी येथील जाहीर सभेत केले.

कारी गटातील उमेदवार सौ.राजश्री महेंद्र शिंदे व कारी गणामधील तानाजी खामकर व अंबवडे गणातील उमेदवार  सौ.कोमल भंडारे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या परळी येथील सभेत खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिकु भाऊ भोसले, आज आम्हाला बाजुला केलं असे आमदार म्हणतात, तथापि विरोधकांच्या पोस्टर्सवर जेवढे चेहरे आहेत त्या सर्वाना आम्ही वेळोवेळी चोपलेले आहे हे लक्षात असुद्यात. कुणावर अन्याय होत असेल तर आम्हाला सहन होत नाही.

कारी गटाच्या कार्यक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खासदार निधी वाटप केला आहे. नुसता राजुचा विकास झाला म्हणजे यांचा संपूर्ण परळी खोऱयाचा विकास झाला, अशी त्यांची विकासाची व्याख्या आहे. प्रचंड गैरकारभार करुन, खोटी कामे दाखवून यांनी माया कमावली आहे.

Related posts: