|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवाजी महाराजांच्या घोषणांनी मडगाव परिसर दुमदुमला

शिवाजी महाराजांच्या घोषणांनी मडगाव परिसर दुमदुमला 

प्रतिनिधी / फातोर्डो

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मडगाव येथील शिवसाम्राज्य संस्थेने यंदाही छत्रपत्री शिवाजी महाराजांची सिंहासनावर आरूढ झालेल्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशांचा गजर आणि जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

प्रारंभी घोगळ येथील ऋषीरंभा देवस्थानाजवळ मूर्तीची पूजा समीर पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे एक हजार शिवप्रेमींनी मूर्तीला मानवंदना दिली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य अमिर नाईक, समीर नाईक, परेश नाईक, अक्षय बोरकर, मयुर दुर्भाटकर, मनोज नाईक, विशांत नाईक व इतरांची उपस्थिती होती.

ढोल, ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत मिरवणुकीला सुरुवात झाली. यामध्ये तरुणांसह युवती, वृद्ध यांच्यासह लहान मुलांचा सहभाग होता.

रुमडामळ भागात सदर संस्थेचा फलक लावण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्या भागात फलक लावण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु सदर ठिकाणी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. शांतपणे मिरवणूक आके मार्गे मडगाव शहरात पोहोचली. ढोल ताशांच्या गजरात शिवजी महारजांच्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.

 

Related posts: