|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » हजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात

हजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता एक हजार रुपयाच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशात सर्वसामान्य जनतेला मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले. सततचा चलनतुटवडा लक्षात घेता दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यानंतरही सतत भासणार चलनतुटवडा सुरळीत करण्यासाठी एक हजार रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात आणण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली.

Related posts: