|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दड्डी-रामेवाडीत अखंड हरिनाम सप्ताह

दड्डी-रामेवाडीत अखंड हरिनाम सप्ताह 

वार्ताहर /दड्डी :

दड्डी, रामेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. बुधवारी ध्वजारोहन शंकरराव भांदुर्गे, तुळस पूजन सुप्रिया नांदवडेकर, कलश पूजन सतिश लोहार, ज्ञानेश्वरी फोटो पूजन राजू कानडे, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन निंगाप्पा अगसगेकर, मुहूर्तमेढ महेश हत्तरगी, गणेश पूजन पितांबर इंगवले, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती पूजा संजय सालगुडे, तुकाराम महाराज पूजन मधुकर नार्वेकर, तुकाराम गाथा पूजन नानासाब कांबळे तर पालखी पूजन रामचंद्र पामनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

विणा पूजन हभप परशराम पाटील, सुभाना नाईक, राजू पाटील, जक्काप्पा पावशे, कल्लाप्पा पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष नार्वेकर, विजय पुजेरी, मारुती दादागोळ, भरमा मुत्कन्नावर, पिराजी पवार, बाबूराव पाटील, तुकाराम कालकुंडा, दत्तात्रय सुतार यांनी केले. सायंकाळी हरिपाठ व हभप पुंडलिक पाटील गुडेवाडी यांचे प्रवचन झाले तर रात्री कीर्तन व दिंडय़ांचे भजन झाले.

यावेळी हार्मोनियम साथ मुशाप महाराज व कीर्तनसाथ श्नी विठ्ठल रखुमाई, लक्ष्मीमाता, पंत, चाळेश्वर भजनी मंडळाने दिली. तसेच जागराचा कार्यक्रम पार पडला. गुरुवारी सकाळी काकड आरती होऊन हभप पुडंलिक पाटील यांचे कालाकीर्तन झाले. तसेच दिंडीची प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.

 

 

 

Related posts: