|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे सालेलीला विकासाची किनार

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे सालेलीला विकासाची किनार 

प्रतिनिधी / वाळपई

नागरिकांची एकजूट मजबूत झाल्यामुळे सालेली गावाला सार्वजनिक विकासाची किनार लाभली आहे. काही प्रमाणात समस्या असल्या तरी नागरिकांनी स्वत: लक्ष घालून विकासावर प्राधान्याने भर दिला आहे. सालेली गावाचा समावेश होंडा ग्रामपंचायत क्षेत्रात करण्यात आला आहे. सत्तरीतील सर्वात जास्त महसूल मिळविणारी ही पंचायत आहे. मात्र विकासाच्या बाबतीत सालेली गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी केळबाय देवस्थान मंदिराची होणारी वाताहत यांचा सारासार विचार करून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सुशोभित मंदिर उभारण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांनी स्वत:च्या खर्चातून मंदिराचे काम हाती घेतले आहे. जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले आहे.

सध्या सालेली गावाच्या विकासाला चालना देणाऱया सालेली, झरमे रस्त्याची योजना जवळपास साडेचार कोटी खर्चून अंमलात येणार आहे. सध्या युद्धपातळीवर काम सुरु असल्याने दोन्ही गावांदरम्यान संपर्क रस्ता होणार आहे. याचा फायदा दोन्ही गावांना होणार आहे. सालेली नागरिकांना वाळपई भागात जाण्यासाठी तर झरमे वासियांना पणजी भागात जाण्यासाठी सदर रस्ता पूर्णपणे उपयुक्त ठरणार आहे. सरकारने सदर योजना दोन्ही गावांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिली आहे. येणाऱया काळात सदर रस्ता दोन्ही गावाच्या विकासाचा साक्षीदार बनणार आहे.

Related posts: