|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काका आठवले वसतिगृहाचे काम भारतीय परंपरेला साजेसे : भागवत

काका आठवले वसतिगृहाचे काम भारतीय परंपरेला साजेसे : भागवत 

प्रतिनिधी / कसबा तारळे

भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात उच्च दर्जाची आहे. अनेक आक्रमणांना खंभीरपणे तोंड देणारी आहे. मात्र अलीकडे सुधारणावादाच्या नावाखाली लयाला जाऊ लागली आहे. भारतीय संस्कृतीची ओळख मुलांना करून देण्यासाठी काका आठवले विध्यार्थी वस्तीगृहाने उचललेले पाऊल भारताच्या वैभवशाली परंपरेत साजेसे आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक दीपक भागवत यांनी केले.

 येथे कै. काका आठवले विध्यार्थी वसतिगृहाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वंदना पाटील होत्या.

  भागवत म्हणाले, परमेश्वराने माणसाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. जसे त्याला दुःख दिले तसे ते दूर करण्यासाठी हास्य दिले आहे.या हास्यांचा उपयोग तो कशा प्रकारे करतो त्यावर त्याच्या जीवनाचे यशापयश अवलंबून आहे.पण आज कृत्रिम हास्यासाठी हास्य क्लब उभे राहतात हेच मोठे हास्यास्पद आहे. सरपंच सौ. पाटील यांचेही भाषण झाले.

  महालक्ष्मी अन्नछत्रचे अध्यक्ष राजू मेवेकरी म्हणाले, अन्नछत्राची वार्षिक उलाढाल 3 कोटी असून सामाजिक कार्यावर 60 लाख रुपये खर्च केला जातो. दरवर्षी पुरेल इतके गोडेतेल देण्याची त्यांनी ग्वाही दिली.

 स्वागत पांडुरंग भोसले यांना तर वसतिगृहाचे व्यवस्थापक श्रीकांत वष्ट यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन संचालक अशोक पोतदार यांनी केले. यावेळी पी. एच. डी. प्राप्त डॉ.एन. डी. पाटील, राजू मेवेकरी ,सामाजिक कार्यकर्ते विवेक वैजापूरकर आदींचा सत्कार जेष्ठ संचालक आण्णा ठाकूर, दीपक भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण  झाले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र तेली, उपाध्यक्ष एम.डी. पाटील,अरुण कुलकर्णी, डॉ. नंदकुमार पाटील यांची मनोगते झाली.

 कार्यक्रमास उपसरपंच लक्ष्मण शिऊडकर, कुमार आठवले ,सौ. सुखदा वष्ट, जोशी, सरवटे, डॉ.सुभाष जाधव, अनंत तेली आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबुराव कामत यांनी केले. सहाय्यक व्यवस्थापक शिरीष गोखले यांनी आभार मानले.

Related posts: