|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही : नारायण राणे

धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय शिवसेना सत्ता सोडणार नाही : नारायण राणे 

ऑनलाईन टीम / पुणे :

शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही, असी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली. ते सोमवारी पुण्यात बोलत होते. सध्या मुंबईत महानगरपालिका सत्ताा स्थपनेसाठी कोणाचा पाठिंबा घ्यायचा, यावरून शिवसेनेत खलबते सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी शिवसनेवर हल्लाबोल केले आहे.

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांना मुंबई महापलिकेच्या निवडणुकीत जवळपास समान जागा मिळाल्यानंतर, महापौरपदासाठी वेगवेगळी गणिते मांडण्याचे प्रयत्न होत असताना या दोन्ही पक्षांतील दरी आणखी वाढवून भाजपची कोंडी करण्याची रणनिती विरोधी पक्षांनी अखिली आहे. मुंबईत महापौपदासाठी भाजपाला मदत करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, शिवसेनेला मात्र अप्रत्यक्षरीत्या मतद पुरवण्यात येऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले असून , त्यामुळे आता पुढे कुठली समीकरणे उदयास येतात, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

Related posts: