|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इरोम शर्मिला यांचा सुरक्षा स्वीकारण्यास नकार

इरोम शर्मिला यांचा सुरक्षा स्वीकारण्यास नकार 

इंफाळ

अफ्स्पा विरोधात 16 वर्षांपर्यंत उपोष करणारी मानवाधिकार कार्यकर्ती इरोम शर्मिला चानू यांनी सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने शर्मिला यांना सुरक्षा उपलब्ध करविण्याचा आदेश दिला होता. त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार ओकराम इबोबी सिंग यांच्याविरोधात थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

आपले कोणाशीही शत्रुत्व नाही आणि मला कोणती भीती देखील नाही. सुरक्षा कर्मचाऱयांनी घेरले राहण्याची व्हीआयपी संस्कृती आपल्याला पसंत नाही, मी लोकांमध्ये राहू इच्छिते असे तिने म्हटले. मणिपुरचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सुरेश बाबू यांनी आयोगाने तिला सुरक्षा देण्याचा निर्देश दिला होता असे सांगितले. याचदरम्यान शर्मिला यांचा पार्टी पीपल्स रीसर्जन्स अँड जस्टिस अलायन्सचे समन्वयक इरेंड्रो यांनी आपल्या सुरक्षेसाठी राज्य सशस्त्र दलाच्या 6 जवानांना तैनात करण्यात आल्याचे सांगितले. मणिपुरमध्ये विधानसभा निवडणुकीत 2 टप्प्यांमध्ये 4 आणि 8 मार्च रोजी मतदान होणार आहे.

Related posts: