|Monday, June 17, 2019
You are here: Home » Automobiles » Lamborghini Aventador S लवकरच लाँच

Lamborghini Aventador S लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

स्पोर्टस् कारच्या जगातील प्रसिद्ध स्पोर्टस् कार निर्माता कंपनी ‘Lamborghini’ खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Aventador S लवकरच लाँच करणार आहे. या नव्या स्पोर्टस् कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत.

lambor

या स्पोर्टस् कारमध्ये 6.5 लिटरचे व्ही 12 इंजिन देण्यात आले असून 0 ते 350 किलोमीटर / प्रतिलिटरमध्ये ही कार 2.9 सेकंदाच्या कालावधीत इतके अंतर पार करु शकते. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही लग्झरी कार 3 मार्च 2017 ला भारतामध्ये लाँच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या कारमध्ये सेरामिक डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यंत वेगात असूनही ही कार सहजपणे नियंत्रित करता येऊ शकते.