|Monday, November 19, 2018
You are here: Home » उद्योग » पीएफच्या धर्तीवर आता गॅच्युइटीचेही होणार हस्तांतरण

पीएफच्या धर्तीवर आता गॅच्युइटीचेही होणार हस्तांतरण 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आता 5 वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यास कर्मचाऱयाला ग्रॅच्युइटीचे नुकसान होणार नाही. भविष्यनिवार्ह निधीच्या (पीएफ) धर्तीवर कर्मचाऱयाच्या ग्रॅच्युइटीचे देखील हस्तांतरण शक्य होणार आहे. यासाटी सरकार प्रत्येक कर्मचाऱयाला ग्रॅच्युइटीकरता यूनिक नंबर देणार आहे. कामगार मंत्रालय यासाठी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायद्यात बदल करण्यावर विचार करत आहे.

ग्रॅच्युइटीचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याचा सरकारचा मानस आहे. यावरून कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि कामगार मंत्रालयात चर्चा देखील झाली आहे. कामगार मंत्रालय ग्रॅच्युइटीला युनिक नंबर देऊन हस्तांतरण करण्यास पात्र बनविण्यावर देखील चर्चा करेल. यात कामगार संघटना, कर्मचारी आणि सरकारचे प्रतिनिधी सामील होतील.

खासगी क्षेत्रात काम करणारे व्यक्ती कमी कालावधीत नोकरी बदलतात. याशिवाय कंत्राटावर काम करणाऱया कर्मचाऱयांना देखील ठेकेदार एका ठिकाणावरून हटवत दुसऱया ठिकाणी कामावर लावतो. अशा स्थितीत कर्मचाऱयांना ग्रॅच्युइटीचे नुकसान होते. सध्या ग्रॅच्युइटीसाठी कमीतकमी 5 वर्षांची सेवा असणे अनिवार्य आहे.

याआधी सरकार आणि कामगार संघटनांमध्ये एकमत होऊन 20 लाख रुपयांची ग्रॅच्युइटी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱयांना मोठा लाभ होणार आहे.

Related posts: