|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » टीचर्स कॉलनीजवळ अडीच लाखाची घरफोडी

टीचर्स कॉलनीजवळ अडीच लाखाची घरफोडी 

प्रतिनिधी/ बेळगाव

टीचर्स कॉलनीनजीकच्या (हिंडलगा, गणेश मंदिरजवळ) संकल्प लेआऊटमधील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. चोरीचा हा प्रकार बुधवारी सायंकाळी उघडकीस आला आहे.

आपल्या घराला कुलूप लावून रविवारी एक कुटुंबीय गावी गेले होते. बुधवारी ते आपल्या घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून सुमारे 80 हजार रुपये रोख रक्कम व पाच तोळय़ांहून अधिक सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे.

हा प्रकार उघडकीस येताच एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास सुरू होता. उपनगरातील बंद घरांचा पाठीमागील दरवाजा फोडून ऐवज लांबविणाऱया टोळीचा उच्छाद सुरूच असून पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Related posts: