|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Automobiles » Honda Mobilio चे प्रॉडक्शन बंद

Honda Mobilio चे प्रॉडक्शन बंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने आपल्या मोबिलियो कारचे प्रॉडक्शन बंद केले आहे. ग्राहकांच्या मागणीत घट आणि विक्रीमध्ये कमी या कारणांमुळे कंपनीने या कारचे प्रॉडक्शन बंद केले आहे. मोबिलियो ही कार 23 जुलै, 2014 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली.

mo

जानेवारी महिन्यात होंडा मोबिलियोच्या फक्त 63 युनिटची विक्री करण्यात आली. मात्र, फेबुवारीमध्ये या कारची डिमांड बऱयाच प्रमाणात कमी झाली. त्यामुळे कंपनीने या कारचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होंडाने भारतामध्ये क्रॉस वाहनांची मागणी पाहता 16 मार्चला डब्लू. आर. व्ही. ही कार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते का, हेच पाहणे गरजेचे आहे.