|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहवू !

चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहवू ! 

बीजिंग / वृत्तसंस्था :

इस्लामिक स्टेटमध्ये सामील झालेल्या उइगूर दहशतवाद्यांनी चीनमध्ये परतण्याची घोषणा केली आहे. आपण चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहू अशी धमकी त्यांनी दिली आहे. उइगूर चीनच्या अल्पसंख्याक समुदायाचे सदस्य आहेत. यातील अनेक जण चीनच्या दडपशाहीच्या धोरणामुळे कंटाळून आयएसमध्ये सामील झाले आहेत.

पश्चिम इराकमध्ये असणाऱया आयएसच्या एका विभागाने सोमवारी अर्ध्या तासाची एक चित्रफीत जारी केली आहे. यात चीनचे उइगूर दहशतवादी दिसून येत आहेत. यात एक उइगूर दहशतवादी एका व्यक्तीला ठार करण्यापूर्वी चीनला धमकी देताना दिसून आला. या चित्रफितीचे विश्लेषण करणारा अमेरिकेचा हेरगट एसआयटीईने ही माहिती दिली आहे.

धमकीत नेमके काय ?

एसआयटीईने केलेल्या अनुवादानुसार दहशतवाद्यांनी चीनला उघड हिंसाचाराची धमकी दिली आहे. “अरे तुम्ही चिनी आहात, लोक काय सांगतात हे तुम्हाला समजत नाही. आम्ही खलिफाचे सैनिक आहोत आणि आम्ही तुम्हाला आमच्या शस्त्रास्त्रांद्वारे जशा नद्या वाहतात तसे रक्त वाहेल आणि छळाचा सूड घेतला जाईल हे सांगण्यास आलो आहोत’’ असे दहशतवाद्याने यात म्हटले आहे. बहुधा ही आयएस दहशतवाद्यांची चीनला पहिलीच उघड धमकी असल्याचे शिंजियांगचे तज्ञ डॉ. मायकल क्लार्क यांनी सांगितले.

उइगूर दहशतवाद्यांमध्ये फूट

चित्रफितीद्वारे धमकीचा प्रकार उइगूर दहशतवाद्यांमध्ये पडलेली फूट देखील असू शकतो. कारण चित्रफितीत उइगूर हल्लेखोरांनी सीरियात अल कायदाचा सहाय्यक मानल्या जाणाऱया तुर्कस्तान इस्लामिक पार्टीला देखील धमकी दिली आहे.

उइगूर

उइगूर हे तुर्कस्तानी मुस्लीम आहेत. ते तुर्की भाषेचा वापर करतात आणि स्वतःला ते चिनी मानत नाहीत. उइगूर लोक शिंजियांगमध्ये दहशतवादाला बळ देतात असे चीनचे मानणे आहे. पाकिस्तानवर उइगूर मुस्लिमांना भडकाविल्याचा आरोप चीनने केला आहे. चीन सरकारनुसार पाकिस्तानच्या काही भागांमध्ये उइगूर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित केले जात आहे.

वादाचे कारण

शिंनजियांग प्रांतात राहणारे उइगूर मुस्लीम चीनपासून वेगळे होऊ इच्छितात. यासाठी ते ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ चालवत आले आहेत. 1949 साली पूर्व तुर्कस्तानला (आताचा शिनजियांग) एक स्वतंत्र देश म्हणून काही काळासाठी ओळख मिळाली होती, परंतु त्याचवर्षी हा प्रांत चीनचा भाग बनला. 1990 मध्ये सोव्हिएत संघाच्या पडझडीनंतर या भागाच्या स्वातंत्र्यासाठी येथील लोकांनी मोठे प्रयत्न केले. त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला मध्य आशियाच्या काही मुस्लीम देशांचे समर्थन देखील मिळाले, परंतु चीनच्या ताठर भूमिकेमुळे सर्व मागे हटले.

Related posts: