|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कर्दे परिसरात एचपीसीएलच्या नावावर बोगस सर्व्हे!

कर्दे परिसरात एचपीसीएलच्या नावावर बोगस सर्व्हे! 

प्रत्यक्षात डिंगणी ते जयगड रेल्वे मार्गाचा सर्व्हे

ड्रोन कॅमेऱयामार्फत सर्व्हे करताना ग्रामस्थांनी रोखले

नीलेश सुर्वे / तवसाळ

गुहागर तालुक्यातील तवसाळ, कर्दे, दोडवली परिसरात एचपीसीएल प्रकल्प होणार असल्याच्या अफवांचा लाभ उठवत गुरूवारी जिंदाल कंपनीच्या पोर्ट विभागामार्फत कर्दे भागाचा ड्रोन कॅमेऱयाच्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला. मात्र या सर्व्हेअरना संतप्त ग्रामस्थांनी रोखत यापुढे कोणतीही शासकीय परवानगी असल्याशिवाय सर्व्हे करू नये, अशी समज देण्यात आली. दरम्यान, या सर्व्हेअरने औद्योगिक प्रकल्प होणार असल्याचे सांगितले. मात्र याचा पुरावा देताना Eिडंगणी ते जयगड रेल्वे लाईनबाबत कंपनीने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या पत्राची प्रत दाखवून उपस्थित ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

तवसाळ, कर्दे, रोहिले येथील सुमारे 200 एकर जमिनीचा त्यांना करावयाचा होता सर्व्हे.

तवसाळ, कर्दे, रोहिले येथील सुमारे 200 एकर जमिनीचा त्यांना करावयाचा होता सर्व्हे.

केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुहागर तालुक्यातील तवसाळ, कर्दे, दोडवली, काताळे या परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही दोनवेळा कोणतीही शासकीय परवानगी नसताना या परिसरात सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ग्रामस्थांनी या सर्व्हेअरना पिटाळून लावले. यामुळे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथे होणार असल्याचे वृत्त असताना अचानक तवसाळ, कर्दे परिसरात शनिवारी ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने सर्व्हे सुरू झाला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत सर्व्हेकरिता आलेल्या कर्मचाऱयांना येथील ग्रामस्थांनी रोखले.

नेरूळ-नवी मुंबई येथील इन्ड्रोंन्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी हर्षद भानुशाली, रविकुमार सिंग, मित्रा गेओस्ता अशी सर्व्हे करण्याकरिता आलेल्या कर्मचाऱयांची नावे आहेत. या कर्मचाऱयांनी ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने येथील परिसराचे फोटो घेण्याचे प्रयत्न केले. मात्र ग्रामस्थांनी त्यांच्याजवळील सर्व साहित्य आपल्या ताब्यात घेऊन सर्व्हे करण्याबाबत आपणाकडे शासकीय परवानगी आहे का, याची विचारणा केली. यावर त्यांनी आम्हाला जिंदाल पोर्टचे लॅण्ड सर्व्हेअर सचिन निकम यांनी याठिकाणी पाठवले असल्याचे सांगितले व तसे उपस्थित ग्रामस्थांना लिहूनही दिले आहे. तसेच या कर्मचाऱयांनी येथील सर्व्हेची परवानगी असल्याचे सांगताना उपस्थित ग्रामस्थांना जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या पत्राची प्रत दाखवली. मात्र हे पत्र सुजाण ग्रामस्थांनी वाचल्यावर इन्ड्रोंन्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डिंगणी ते जयगड कंपनीपर्यंत येणाऱया 33.70 किलोमिटरच्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे करण्याच्या देण्यात आलेल्या कामाबाबत जिल्हाधिकाऱयांना कळवल्याचे पत्र असल्याचे समोर आले. यामुळे सर्व्हेसाठी आलेल्या कर्मचाऱयांनीही येथील ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे.

जिंदाल सर्व्हेअरने झटकले हात

दरम्यान, याबाबत जिंदाल पोर्टचे लॅण्ड सर्व्हेअर सचिन निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहीत नसून आपण केवळ त्यांना तेथील जागेची माहिती देत आहोत आणि येथे नक्की कशासाठी सर्व्हे केला जात आहे हे मला माहीत नाही असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून या विषयावर अनेक बैठका घेण्यात येत आहेत.