|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आ.परिचारकांना पोलिस बंदोबस्त

आ.परिचारकांना पोलिस बंदोबस्त 

पंढरपूर / प्रतिनिधी

   सैनिकाप्रती केलेल्या ‘ त्या’ वादग्रस्त विधानानंतर आता आ.प्रशांत परिचारक यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

आ.प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारांमधे सैनिकाप्रती अपशब्द वापरले होते. त्यानंतर त्यांचा संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत होतो. यामधेच सोलापूर जिल्हयात तसेच राज्यातील इतरही जिल्हयात त्यांच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली होती. तर काही ठिकाणी त्यांच्याविरूध्द देशद्रोहांचा गुन्हा तसेच न्यायालयात तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.

   सध्या आ.परिचारकांच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात ठिणगी पेटत आहे. यामधेच माजी सैनिकांनी तर 7 मार्च रोजी चक्क  आ.परिचारकांच्या घरांवर मोर्चा काढणार असल्यांचे जाहीर केले. तर काही सैनिक आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी यांनी त्यांच्यावर दगडफ्sढक करणार असलयांच्या वल्ग्ना देखिल केल्या.

  यामधे तर सातारा येथील खा. छ. उदयनराजे भोसले यांनी तर आ. परिचारक यांना ठोकून काढणार असल्यांची भाषा वापरली. यानंतर या आठवडयापासून राज्योचे विधीमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. यामधेही आ.परिचारक यांच्या निषेधार्थ मोठा गोंधळ होण्यांची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने आ. परिचारक यांना पोलिस बंदोबस्त दिला आहे.

  सध्या आ. परिचारकांच्या बंदोबस्तासाठी एक फ्ढाwजदार आणि तीन हवालदार तैनात करण्यात आले आहे. सदरचे चारही पोलिस कर्मचारी हे आ. परिचारक यांच्यासोबतच पूर्णवेळ बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.