|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » केजरीवालांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

केजरीवालांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राज्यसभा खासदार डॉ. सुभाषचंद्रा यांच्या मानहानीप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 29 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्लीतील एका न्यायालयाने दिले आहेत.

चंद्रा यांनी नोटाबंदीनंतर केजरीवाल यांच्याविरोधात आरोप करत मागील वर्षी 17 नोव्हेंबरला त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली होती. एस्सेल समूहाचे प्रमुख चंद्रा यांनी याचिकेमध्ये सांगितले, केजरीवाल यांनी 11 नोव्हेंबरला त्यांच्याविरोधात चुकीची आणि मानहानी करणारे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. आता केजरीवालांना 29 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

Related posts: