|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

जि.प.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर 

सिंधुदुर्गनगरी : सन 2015-16 चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकूण 11 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांची पडताळणी करून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण आठ आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

प्रस्तावांची पडताळणी करून 400 पैकी गुणांकन देण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातून मोरगाव-आडाळीचे ग्रामसेवक नम्रता प्रभाकर राणे (286 गुण), सावंतवाडी तालुक्यातून गुळदुवे-नाणोसचे ग्रामसेवक भालचंद्र अंकुश सावंत (291.50 गुण), वेंगुर्ले तालुक्यातून आसोलीचे ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर (345.90 गुण), कुडाळ तालुक्यातून वाडोसचे ग्रामविकास अधिकारी वैभव महादेव सावंत (275.44 गुण), मालवण तालुक्यातून किर्लोसचे ग्रामसेवक रामचंद्र रघुनाथ वनकर (339.40 गुण), कणकवली तालुक्यातून तोंडवली बावशीचे ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम (314 गुण), देवगड तालुक्यातून फणसेचे ग्रामसेवक उज्वल वामन झरकर (379 गुण), वैभववाडी तालुक्यातून कुसुरचे ग्रामसेवक घनःश्याम शिवराम नावळे (248 गुण) याप्रमाणे आठ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श ग्रामसेवक पुरस्कार निवड समितीने पुरस्कारासाठी प्राप्त 11 प्रस्तावांची शासन निकषानुसार पडताळणी केली व आठ ग्रामसेवकांची 2015-2016 साठी आदर्श पुरस्कारासाठी निवड केली. लवकरच समारंभपूर्वक पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती आदर्श ग्रामसेवक निवड समितीचे सचिव तथा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.