|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अनुराग ठाकूरांचा माफीनामा सादर

अनुराग ठाकूरांचा माफीनामा सादर 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

न्यायालयात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी दोषी आढलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला.  याप्रकरणी 17 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

 बीसीसीआयमधील बेबंदशाही संपविण्यासाठी जानेवारी 2015 मध्ये माजी मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र या समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्याने अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांची 2 जानेवारी 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने पदावरून हकालपट्टी केली होती. तत्पूर्वी याप्रकरणी 15 डिसेंबर रोजी तत्कालिन सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. यावेळी अनुराग ठाकुर यांच्यावर खोटी साक्ष दिल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतले होती. आता खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांनी माफी मागितली आहे.

Related posts: