|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » मातृत्त्वाची गाथा मांडणारी ‘हिकरणी’ लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार

मातृत्त्वाची गाथा मांडणारी ‘हिकरणी’ लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

इतिहासातील हिकरणीची गोष्ट मातृत्त्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. ‘आई’ या शब्दांत सामर्थ्य सांगणरी ही कथा आधुनिन स्त्रीच्या जीवनाशी आगदी मिळती – जुळती आहे. असेच म्हणावे लागेल. मराठा सम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर एक अवघड बुरूज काळय़ाकभिन्न अंधारात, आपल्या ताह्या बाळासाठी उमरून येणाऱया या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहेतच. मात्र, आता मातृत्त्वाच्या या धाडसाची गाथा लवकरच मोठय़ा पडद्यावर पहायला मिळणार आहे.

प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या सिनेमाद्वारे आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी पटकथा आणि संवाद लिहले आहे.