|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Top News » इंदिरा गांधींना गरिबांचे दुःख कमी करता आले नाही : पंतप्रधान

इंदिरा गांधींना गरिबांचे दुःख कमी करता आले नाही : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण केले मात्र त्यांना गरिबांचे दुःख कमी करता आले नाही, गरीब हे गरीबच राहिले, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सोमनाथ येथे एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्याने देशातील गरीबी कमी होईल, गरिबांचे कल्याण होईल, असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. मात्र, देशातील गरिबी कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे. त्या ठिकाणची परिस्थिती भयावह आहे. गावातील वीजेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इथे एका गावात फक्त पोल उभे केले जातात तर दुसऱया गावात फक्त तारांचे बंडल पडलेले दिसते आणि तिसऱया गावात वीजेचा ट्रान्सफॉर्मर दिसतो.

Related posts: