|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » leadingnews » यूपीत सत्ता कोणाची ? ; एग्झिट पोल जारी

यूपीत सत्ता कोणाची ? ; एग्झिट पोल जारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाची सत्ता येणार या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकांचे निकाल 11 मार्चला लागणार आहेत. मात्र, या निकालांचे एग्झिट पोल जारी करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. देशभरात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असली तरी या राज्यात कोणता पक्ष आघाडी घेईल, याबाबतचे अंदाज सध्या एग्झिट पोलच्या माध्यमातून बांधला जात आहे. राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा सध्यातरी अंदाज वर्तवला जात आहे. एग्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाला 164 ते 176, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष आणि मित्रपक्षांना 156 ते 169, मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला 60 ते 72 जागा तर इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या एग्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसून भाजप आणि सपा-काँग्रेसमध्येच खरी टक्कर असल्याचे निर्देशनास येत आहे. मात्र, 11 मार्चलाच या राज्यात कोणाची ‘हवा’ असेल हे सिद्ध होईल.