|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » उद्योग » व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्जद्वारे सुरक्षित करा तुमचा मोबाईल क्रमांक

व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्जद्वारे सुरक्षित करा तुमचा मोबाईल क्रमांक 

मुंबई :

आपल्या ग्राहकांना अधिक सक्षम करण्यासाठी व्होडाफोन इंडियाने मुंबईतील ग्राहकांसाठी ‘व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज’ ही अभिनव सेवा सुरू केली आहे. ही विनामूल्य सेवा असून, या सेवेद्वारे प्रीपेड ग्राहकांना आपला मोबाईल फोन क्रमांक दुकानदाराला न सांगताही रिचार्ज करता येणार आहे.

या सेवेचा प्रारंभ झाल्याची घोषणा करताना, व्होडाफोन इंडियाच्या मुंबई परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख पुष्पिंदर सिंग गुजराल म्हणाले, ‘जग डिजिटल मार्गक्रमण करत असताना आणि स्मार्टफोन हे माहिती साठविण्याचे प्राथमिक साधन असताना, वैयक्तिक माहिती सुरक्षितता हा लोकांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. ‘व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज’ मुळे ग्राहकांना आपले मोबाईल फोन क्रमांक खासगी ठेवण्यास, तसेच ते गैरवापरापासून सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे, मुंबईत सर्वाधिक प्राधान्याने वापरली जाणारी दूरसंचार सेवा म्हणून ख्याती असलेल्या व्होडाफोनला या क्रांतिकारी सेवेचा प्रारंभ करताना आनंद होत असून, यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सक्षम वाटेल.

ग्राहकाला 12604 या क्रमांकावर PRIVATE असा एसएमएस पाठवून ‘व्होडाफोन प्रायव्हेट रिचार्ज’ चा पर्याय मिळविता येईल. या एसएमएसला उत्तर म्हणून ग्राहकाला एक 10 आकडी ओटीपी मिळेल. ग्राहकाला एखादे मल्टीबँड रिटेल आऊटलेट वा व्होडाफोन स्टोअर अथवा व्होडाफोन मनी स्टोअरमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकाऐवजी हा क्रमांक देऊन आपल्याला हव्या त्या किमतीचे रिचार्ज करता येईल. रिचार्ज झाल्याचा संदेश देणारी पोचपावती ग्राहकाच्या मोबाईल फोन क्रमांकाला पाठविली जाईल आणि अशा रितीने रिचार्जची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Related posts: