|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » स्वातंत्र्यानंतरचे मोदीच सर्वांत लोकप्रिय नेते : अमित शहा

स्वातंत्र्यानंतरचे मोदीच सर्वांत लोकप्रिय नेते : अमित शहा 

 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच स्वातंत्र्यानंतरचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांतील निकालाचे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज विश्लेषण केले.

अमित शहा म्हणाले, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर गोवा व मणिपूरमध्येही पक्षाने आपली ताकद राखली आहे. या निकालाच्या माध्यमातून जातीयवाद व घराणेशाहीला जनतेने नाकारले आहे. मोदी सरकारने मागच्या तीन वर्षांत भरीव कामे केली आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाचा पक्षाला लाभ झाला असून, विरोधकांना जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा विजय आहे. तर मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत लोकप्रिय नेते असल्यावरही यातून शिक्कामार्तेब झाले आहे. मोदी यांच्याप्रती देशातील गरिबांनी श्रद्धा व आस्था दाखविली आहे. वीज, पाणी, बँक खाते, एलपीजी, शौचालये गरिबांना उपलब्ध झाली असून, हा वर्ग मोदींशी घट्ट जोडला गेला आहे. त्यामुळे या सगळय़ाला जातीपातीची गणिते लावणे योग्य ठरत नाही, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी उद्या दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात येणार आहेत. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत चारही राज्यांच्या नेतृत्वाबाबत चर्चा होईल. योग्य व पात्र व्यक्तीकडेच नेतृत्वाची धुरा सोपवली जाईल. गोव्यात फटका बसला असला, तरी तेथेही आमचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा त्यांनी केला.

मायावती यांच्या भावना मी समजू शकतो, असा टोला लगावतानाच आता हिंदू-मुस्लिम या विभागणीतून लोक बाहेर पडले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Related posts: