|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार

स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी व भगिनी मंच यांच्या संयुक्त विदयमाने स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच भगिनी मंच संचलित छत्रपती ताराराणी गारमेंट पार्कच्या वतीने सीपीआरमधील रूग्णांना फळेवाटप करण्यात आले. फळेवाटप मंचच्या अध्यक्षा

मुक्त पत्रकारिता व सामाजिक कार्याबददल सुधा आयरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गारमेंट पार्कमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबददल महिला कर्मचारी वैशाली पाटील, अश्विनी भोसले, सुजाता दळवी व रेश्मा मपोर या म†िहलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, स्त्रियांचे समाजातील स्थान उंचावून, स्त्रियांवरील अत्याचार करणारया नपुंसक शक्तींना कायमचा पायबंध घालण्याकरिता स्त्री शक्तीने एकवटून सबलीकरणाव्दारे या सर्वांवर मात करणे गरजेचे बनले आहे. याकरिता विविध उपक्रमाव्दारे शिवसेना महिला आघाडी व भगिनी मंच सातत्याने प्रयत्नशिल असून महिलांकरिता हवकाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कटिबध्द आहोत. यावेळी महिला आघाडीच्या दिशा क्षीरसागर, पुजा भोर, मेघना पेडणेकर, स्वाती क्षीरसागर, सोनाली पेडणेकर, मंगल कुलकर्णी, गीता भंडारी, शाहीन काझी यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य व छत्रपती ताराराणी गारमेंट पार्कमधील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 

 

Related posts: