|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तरूण भारत संवादचे पंढरपूरकरांकडून स्वागत

तरूण भारत संवादचे पंढरपूरकरांकडून स्वागत 

पंढरपूर / प्रतिनिधी

तरूण भारत संवाद कार्यालयांच्या उदघाटनप्रसंगी पंढरपूरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी सीमाभागातील मुखपत्रांच्या झंझावती प्रवासाचा आलेख उपस्थितांसमोर उभा करून पंढरपूरकरांच्या मनात मोठया आदरांचे स्थान निर्माण केले.

   उदघाटनांच्या कार्यक्रमांप्रसंगी तरूण भारत संवादच्या वतीने यावेळी लोकशिक्षण आणि अन्यायाविरूध्द झुंज देणा-या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामधे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी , पालवी संस्थेंच्या संचालिका डिंम्पलताई घाडगे , ह.भ.प. राणा महाराज वासकर , ज्येष्ठ पत्रकार आणि वर्तमानपत्र विक्रेते प्रकाश पटवर्धन , यांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

  सदरच्या कार्यक्रमांस पोलीस निरिक्षक विठठल दबडे , वाहतुक शाखेचे पोलीस उपनि†िक्षक निलेश गोपाळचावडीकर , तालुका पोलिस निरिक्षक क्रष्णदेव खराडे,  संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे , ह.भ.प. रामक्रष्ण महाराज वीर , ह.भ.प. जवंजाळ महाराज , ह.भ.प. प्रसाद महाराज बडवे , हिंदुमहासभेचे अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे , विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे डी. राज सर्वगोड , रोटरी क्लबचे ऍड राजेंद्र केसकर , पंढरपूर बॅकेंचे संचालक शांताराम कुलकर्णी , माधुरी जोशी , नगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी सुनील वाळूजकर , पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन ढावरे , महेश खिस्ते , सचिन कांबळे , नगरसेवक सुधीर धोत्रे , कॉग्रेसचे अध्यक्ष ऍड राजेंश भादुले , भाजपाचे शहराध्यक्ष सौदागर मोळक ,  माजी उपनगराध्यक्ष व पंढरपूर मर्चण्ट बॅकेंचे चेअरमन नागेश भोसले , ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी, नगरसेवक ऋषिकेश उत्पात , पालिकेतील पक्षनेते ऍड गुरूदास अभ्यंकर , माजी नगरसेवक मर्चण्ट बॅकेंचे संचालक आदित्य फ्ढत्तेपूरकर ,डॉ प्रविदत्त वांगीकर , डॉ विश्वास मोरे , दलित संघटनेचे क्रष्णा वाघमारे , शिवसेनेचे शहरप्रमुख संदिप केंदळे , राष्ट्रवादीं युवक कॉग्रेसचे कार्याध्यक्ष बंटी वाघ  वर्तमानपत्र विक्रेते संघटनेचे संतोष कुलकर्णी , महेश पटवर्धन यांच्यासह असंख्य मान्यवरांनी याप्रसंगी तरूण भारत संवादच्या नूतन कार्यालयात हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.

साधारणपणे सायंकाळी सात वाजलेपासून तरूण भारत संवादच्या असंख्य वाचकांनी येउन भेटी देत शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी स्वीकारला. साधारणपणे सामाजिक , आर्थिक , राजकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी या कार्यक्रमांस होती.

Related posts: