|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Automobiles » Royal Enfield BSIV लाँच

Royal Enfield BSIV लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चेन्नईची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने 4 एमिशन कंम्पप्लाइंटच्या अंतर्गत आपली नवी मोटारसायकलची नवी रेंज नुकतीच लाँच केली आहे. रॉयल एनफिल्डची नवी इलेक्ट्रा 350 डिलरशिपची असून, पुढील आठवडय़ात ही बाइक उपलब्ध केली जाणार आहे.

bullet

रॉयल एनफिल्ड कंपनीने आपल्या नव्या मोटारसायकलींच्या रेंजची किमतीत वाढ केली आहे. तसेच यामध्ये नवे फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. BSIV इंजिन असणाऱया या नव्या बाइकमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन हे फिचर्स देण्यात आले आहे.

– असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – 346 सीसीचे ट्विन स्पार्क सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, 19.8 बीएचपीची पॉवर आणि 28 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असेल.

– ट्रान्समिशन – 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

– इंधन क्षमता – 13 लिटर

– ब्रेकिंग सिस्टिम – प्रंट 280 एमएम डिस्क ब्रेक्स आणि रिअर 153 एमएम ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहे.