|Friday, November 16, 2018
You are here: Home » Automobiles » दुचाकी विक्रीमध्ये आठ टक्क्यांनी वाढ होणार

दुचाकी विक्रीमध्ये आठ टक्क्यांनी वाढ होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नोटाबंदीमुळे दुचाकी विक्रीचा दर 2 अंकांवरून कमी झाल्याने चालू अर्थिक वर्षाच्या अखेरीस देशातील दुचाकी विक्रीमध्ये 7 ते 8 टक्के वाढ होण्याच्य अंदाज वर्तविण्यात आला आहे. इक्रा या संस्थेने दुचाकी विक्रीबाबतचा एक अहवाल जाहीर केला असून, त्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर देशातील दुचाकी विक्रीला त्याचा मोठा फटका बसला तोपर्यंत दुचाकी विक्रीचा वृद्धी दर 2 अंकात होता. मात्र नोव्हेंबर ते जानेवारी या काळामध्ये त्यात 11.3 टक्क्यांनी घट झालेली दिसून आली. आता चालू अर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दुचाकी विक्री जोर पकडण्याची शक्यता असून, त्यामुळेच या उद्योगाच्या वाढीचा वार्षिक दर 7 ते 8 टक्के राहण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Related posts: