|Saturday, November 17, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ 100 कोटी क्लबमध्ये

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ 100 कोटी क्लबमध्ये 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आलिया भट आणि वरूण धवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रदर्शनाच्या एक आठवडय़ात 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटी रूपयांची कमाई केली आहे.

सिनेमाने गुरूवारी देशभरात 5.06 रूपयांचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाची कमाई 70 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सिनेमा बनवल्यापासून त्याचे प्रमोशन करण्यापर्यंत सुमारे 50 कोटी रूपये खर्च केले होते. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ने पहिल्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला 12.25 कोटी रूपये कमावले होते. वीकेण्ड असल्याने शनिवारी चित्रपटाने 14.75 कोटी कमावले. तर 12 मार्चला सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक 16.05 कोटी रूपयांचा गल्ला जमवला. सोमवारी 12.08 कोटी मंगळवारी 7.52 कोटी, बुधवारी 5.95 कोटी तर गुरूवारी सिनेमाने 5.06 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई 73.66 कोटी झाली आहे, आलिया आणि वरूण हे तिसऱयांदा एकत्र काम करत आहेत. ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘हम्प्डी शर्मा की दुल्हनिया’मध्ये ते एकत्र दिसले होते.

Related posts: