|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » Top News » धारावीत एटीएम कॅश व्हॅन लुटणाऱया साताऱ्यातून तिघांना अटक

धारावीत एटीएम कॅश व्हॅन लुटणाऱया साताऱ्यातून तिघांना अटक 

ऑनलाईन टीम / सातारा

मुंबईच्या धारावी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आलेलया व्हॅनमधील पैसे लुटाणाऱया तिघांना शुक्रवारी रात्री साताऱया अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साताऱयातील आणेवाडी टोलनाक्यावर एका ट्रव्हल्स बसमधून या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून 15 लाख 40 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या चौकशीमुळे या संपूणे प्रकरणाचा छडा लागला आहे.

धारावीत गुरूवारी दुपारी तीन वाजण्याचा सुमारास धारावतील ओएनजीसी कंपनीसमोर एसबीआफ एटीएम यंत्रात रोकड भरण्यासाठी लॉजीकॅशची व्हॅन आली. व्हॅनमध्ये चालक आणि तीन कर्मचारी होते. तसेच रोकड भरलेल्या दोन पेटय़ा होत्या. त्यातील एक पेटी तीनकर्मचाऱयांनी उचलली. ते एटीएमध्ये पैसे भरण्यासाठी गेले. ते परतले तेव्हा व्हॅनच दरवाजा सताड उघडा होता. तसेच 1 कोटी 56 असलेली पेटीही गायब होती. चोरी झाल्याची माहिती कंपनीच्या मुख्यालयातून धारावी पोलिसांपर्यंत पोहोचली.

 

Related posts: