|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » स्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री

स्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील 7 शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, या शहरांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागात 2 लाख 50 हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी 710 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. तसेच नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर शिर्डी समाधीला शतकपूर्ती होत आहे. या शतकपूर्तिनिमित्ताने शिर्डी विमानतळ बांधण्यात येणार असून, 50 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 1 कोटी 630 लाखांची तरतूद करण्यात येणार असून, ग्रामीण भागांतील रस्त्यांसाठी 570 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर, अमरावती आणि चंद्रपूर या विमानतळांच्या विकासकामांसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

Related posts: