|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मारुती मनेसर हिंसेप्रकरणी 13 जणांना जन्मठेप

मारुती मनेसर हिंसेप्रकरणी 13 जणांना जन्मठेप 

गुरुग्राम

 2012 साली मारुती सुझुकीच्या मनेसर प्रकल्पात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी हरियाणातील गुरुग्राम न्यायालयाने 13 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 4 दोषींना 5 वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली गेली. न्यायालयाने 14 जणांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली, परंतु या दोषींनी आपल्या शिक्षेचा कालावधी आधीच भोगला आहे.10 मार्च रोजी न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देत 31 आरोपींना दोषी ठरविले होते. तर 117 जणांना आरोपातून मुक्त केले होते. प्रकरणात एकूण 148 आरोपी होते, ज्यातील 90 जणांचे नाव एफआयआरमध्ये नव्हते.18 जुलै 2012 रोजी मारुती सुझुकीच्या मनेसर प्रकल्पात संपावेळी झालेल्या हिंसाचारात व्यवस्थापनाचे 98 जण जखमी झाले होते. तर महाव्यवस्थापक अवनीश देव यांना जिवंत जाळण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकल्पाचा बहुतेक भाग जळून खाक झाला होता तसेच परिसरात जोरदार तोडफोड झाली होती. याप्रकरणी 148 जणांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.