|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कर वसुली तूट लवकर पूर्ण करा

कर वसुली तूट लवकर पूर्ण करा 

वार्ताहर/ सोलापूर

शहरातील मिळकतदारांकडून अद्याप बरीच थकबाकी राहिली आहे. येत्या मार्च अखेर उद्दष्टाच्या 30 टक्के थकबाकी वसुल करावी, असे आदेश महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम यांनी संबधित अधिकाऱयांना दिले. शहरातील मिळकतदारांच्या वसुलीबाबत व थकीत वसुलीबाबत त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. 

    निवडणुकीच्या कालावधीत मालमत्ता कर वसुली थंड पडली होती. दरम्यान निकालानंतर वसुलीत चांगली वाढ झाली आहे. गतवषीपेक्षा यंदा दहा कोटींची अधीक वसुली झाली आहे. तरी पण वसुलीत मोठी तूट असल्याने ती येत्या आठवड्यात भरून काढण्यासाठी पावले उचलावीत असे आयुक्त काळम पाटील यांनी सांगितले.

    महापालिकेच्या कराची चालू वषीची 106 कोटी रूपये तर मागील थकबाकी 200 कोटींवर आहे. पालिकेच्या मिळकत कराची व अन्य विभागातील 100 टक्के वसुली मार्चअखेर करावी, असे आदेश शासनाच्या नगर विकास खात्याकडून महापालिकेला देण्यात आले आहेत. यावरून आयुक्तांनी 1 मार्चपासून विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. मोठय़ा थकबाकीदारांसह 50 हजारांवरील थकीत असलेल्या मिळकतदारांना मनपाच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत. यानुसार त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. ही मोहीम आणखी तीव्र करून वसुली न देणाऱयांच्या मिळकती सील व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातूनच गेल्या 17 दिवसांत अडीच कोटींची वसुली या विभागांकडून व झोन कार्यालयाकडून करण्यात आली आहे. गेल्या 11 महिन्यात उद्दष्टाची 20 टक्केही रक्कम वसुल करण्यात न आल्याने संबधित अधिकाऱयांनी 21 मार्चपर्यंत उद्दष्टाची 30 टक्के वसुली करण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देत आयुक्तांनी अधिकाऱयांना खडसावले. यानंतर आयुक्तांनी शहरातील 54 मीटर रस्त्याच्या कामासंदर्भातही आढावा घेतला.