|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » दिग्गज कलाकारांना गौरविण्याची संधी

दिग्गज कलाकारांना गौरविण्याची संधी 

‘टाइमलेस डिजिटल ऍवॉर्ड्स’ या भारतातील पहिल्यावहिल्या ऑनलाइन सिनेपुरस्कारांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सोनी मॅक्स 2 या पुरस्कारांचे दुसरे पर्व घेऊन येत आहे. बॉलिवूडचे जादुई जगत आणि त्यातील काही अप्रतिम माणसांना मानवंदना देण्यासाठी या पुरस्कांचे आयोजन केले जाते. प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा छेडणारे सिनेमे आणि प्रत्येक जण स्वत:ला जोडून घेऊ शकेल, अशा व्यक्तिरेखा यांच्यासह सोनी मॅक्स-2 बॉलिवूडमधील 70च्या दशकाची जादू पुन्हा आणणार आहे. यासाठी प्रेक्षकांना विविध विभागातील त्यांच्या आवडत्या व्यक्तींना मत देण्याची संधी दिली जाणार आहे.

यात सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना फेसबुक, ट्विटर किंवा अधिकृत ईमेल आयडीवरून मायक्रोसाइटवर लॉगइन करावे लागेल. हे डिजिटल ऍवॉर्ड या खास तयार करण्यात आलेल्या मायक्रोसाइटच्या माध्यमातून आयोजित केले जातील. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, जोडी, संवाद, विनोदी कलाकार, पॅशन आयकॉन, खलनायक, गायिका, गायक, खलनायिका आणि संगीतकार या विभागांमध्ये प्रेक्षकांना मतदान करता येणार आहे. पेक्षकांसाठी 15 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान वोटिंग लाइन्स सुरू असतील. सर्व विभागातील विजेते प्रेक्षकांकडून मिळालेल्या सर्वाधिक मतांनुसार निवडले जातील आणि वाहिनीच्या सोशल मिडिया पेजेसवरून डिजिटल वॉलवर त्यांचा सन्मान करण्यात येईल.

मतदात्यांना ‘आओ क्विझ करे’ सारख्या उपक्रमांमध्येही सहभागी होता येईल. यात एक व्यक्तिमत्त्व चाचणी असेल. यातून 70 च्या दशकातील कोणत्या कलाकारासारखे तुम्ही आहात, हे शोधता येईल. या प्रवासात थोडी गंमत आणि मजा आणण्यासाठी मतदारांना ‘टाईमलेस पोझ ऑफ द वीक’मध्येही सहभागी होता येईल. यात चार आठवडय़ांसाठी दर आठवडय़ाला एक याप्रमाणे एका ‘टाईमलेस स्टार’चा प्रसिद्ध पोझमधील फोटो दाखवला जाईल. प्रेक्षकांना या स्टारसारखी पोझ देऊन फोटो काढायचा आणि तो क्ष्ऊग्सतेझ्दाध्Tिपांक् या हॅशटॅगसह इन्स्टाग्रामवर शेअर करायचा आहे. यातून दररोज काही खास गिफ्ट वाऊचर जिंकण्याची संधी मिळू शकते.

याचबरोबर वाहिनी प्रेक्षकांना आठवणींची सफर घडवणार आहे. यात या हॅशटॅगसह प्रेक्षकांना त्यांच्या पालकांसोबतच्या बॉलिवुड आठवणी शेअर करता येतील. वाहिनी या फोटोंना कस्टमाईज्ड करून ही स्पर्धा जिंकणाऱया सर्वोत्कृष्ट 20 फोटेंसाठी पोस्टर्स तयार करेल. सहभागी होऊन सर्व विभागात मतदान करणाऱया एका विजेत्याला आयफोन 7 जिंकण्याची संधीही आहे.