|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

यंदा मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गुढीपाडवाच्या दिवशी राजकीय पक्षांकडून अनेक मेळावे घेण्यात येत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परदेशी दौऱयावर जाणार असल्याने हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.

गुढीपाडव्याची दिवशी बहुतांशी राजकीय पक्ष मेळावे घेत असतात. मनसेकडूनही गुढीपाडव्याला मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र, राज ठाकरे हे गुढीपाडव्याच्या दिवशी दौऱयावर जाणार आहेत. त्यामुळे मनसेचा हा मेळावा रद्द करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय पक्षांच्या मेळाव्यालाही मोठय़ा संख्येने गर्दी असते. या मेळाव्याला अनेक जण उपस्थित होत असल्याने हा मेळावा अचानकपणे रद्द करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.