|Monday, July 31, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केली आहे. प्रामाणिकपणे काम करणे हे सर्वात महत्त्वाचेकेली आहे. प्रामाणिकपणे काम करणे हे सर्वात महत्त्वाचे 

मनीषा सुभेदार / बेळगाव

शॉर्ट्स, जिन्स आणि स्कर्टच्या जमान्यात दोन वेण्यांचा झोपाळा, उजव्या खांद्यावरून ओढून घेतलेला पदर, कपाळावर कुंकवाचा टिळा आणि डोळय़ात निरागस पण मिश्कील भाव अशी एखादी स्त्राr भलतीच लोकप्रिय व्हावी. यामध्ये तिचे वेगळेपण दडलेले असावे. खरे तर हे एखाद्या जुन्या मराठी अथवा हिंदी चित्रपटातील नायिकेचे वर्णन! मात्र आज अशाच स्त्राr पात्राला मराठी रसिकांनी भलतेच डोक्मयावर घेतले आहे. हे स्त्राrपात्र म्हणजे चूकभूल द्यावी, घ्यावी या मालिकेतील तरुण मालूचे. खरे तर ही कोणी मोठी अभिनेत्री असेल, असा तुमचा अंदाज असेल तर तो साफ चूक आहे. हे स्त्राrपात्र करणारी मालू म्हणजेच सायली फाटक. ही नुकतेच शिक्षण पूर्ण केलेली तरुणी आहे. विशेष म्हणजे या वर्षभरातच तिच्याकडे अशा जुन्या नाटय़चित्रपटातील भूमिकाच आलेल्या आहेत.

सायली नुकतीच बेळगावला येवून गेली. संध्या शानभाग यांच्या निवासस्थानी बिंबा नाडकर्णी यांच्या समवेत तिच्याशी सहज गप्पा झाल्या. ही ठरवून घेतलेली मुलाखत नव्हती. मात्र एका तरुण अभिनेत्रीचा प्रवास किती वेगळा असू शकतो. तिच्याकडे भूमिका कशा आल्या? नाटय़सृष्टित तरुणाई नेमके काय करते आहे? हे सर्वच जाणून घेता आले. खरे तर सायलीला पाहताच हीच ‘मालू’चे पात्र साकारते, यावर प्रथम विश्वास बसत नाही. हळूहळू बोलण्यातून या पात्राचे वैशिष्टय़ ती टिपते आणि मग आपलाही विश्वास बसतो.

सायली खरे तर क्लिनिकल सायकॉलॉजीची विद्यार्थिनी. तिची आई चारु गृहिणी तर वडील सुधीर आता फोटोशूटचे काम करतात. भाऊ सलील सिनेमॅटोग्राफर आहे. तिला जनमानसात मिसळायला आवडते. त्यामुळे आपण समुपदेशक व्हायचे, असे तिने ठरविले होते. मात्र बालपणी राधिका इंगळे नाटय़ कार्यशाळा घेत असतं. त्यामध्ये सायलीही सहभागी असायची. सायली खरे तर कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी. मराठीशी तिचा तसा दृढ संबंध नव्हता. राधिका इंगळे ग्रीप्सची नाटके दाखवत असे. ही नाटके आपल्याला इतकी आवडली की आपण तेथेच इन्स्ट्रक्टर म्हणून रुजू झाले. त्याचबरोबर माध्यम नावाच्या संस्थेत तीन वर्षे शिकविले, असे ती सहज सांगून जाते.

सायली फर्ग्युसन कॉलेजची. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व पुरुषोत्तम करंडक तिने गाजविला. यामुळे रंगभूमीचा वेगळाच अनुभव येतो, असे ती म्हणाली. दरम्यान तिने व अलोक राजवाडे, अमेय वाघ (दिल दोस्ती, दोबारा), निपुण धर्माधिकारी यांनी एकत्र येवून ‘आसक्त’ संस्था स्थापन केली. तर किरण यज्ञोपवीत, संदेश कुलकर्णी यांच्या समन्वय संस्थेशी ती जोडली गेली. अमेयनेच मनवा नाईक हिला मालूच्या भूमिकेसाठी माझे नाव सुचविले. शिवाय मनवा व तिचे काका राजीव नाईक यांनी माझे काम पाहिले होते. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये चिनुची छोटी भूमिका केली होती. मनवाने माझी ऑडीशन टेस्ट घेतली आणि लूक पसंत पडताच माझी निवड झाली, असे सायली सांगते.

 वर्षभरात जुन्या काळातीलच भूमिका

मालू हे जुन्या मराठी चित्रपटातील टिपीकल मध्यवर्गीय गृहिणीचे पात्र आहे. ही भूमिका करण्यासाठी तुला किती बदल करावा लागला? या प्रश्नावर सायली दिलखुलास हसत म्हणाली, या वर्षभरात माझ्याकडे जुन्या काळातीलच भूमिका आल्या आहेत. ‘मित्राची गोष्ट’मध्ये मी ‘मित्रा’चे, ‘सिंधू सुधाकर रमणी’ यामध्ये सिंधूचे काम केले होते. ‘मालू’ हे त्या पुढचे पाऊल आहे. आणि ही भूमिका करताना विलक्षण मजा येते. ती साकारताना तुझे काय काय निरीक्षण होते. या प्रश्नावर मी आई-वडिलांपेक्षा आजी, आजोबांना डोळय़ासमोर आणले. आजीची प्रतिक्रिया काय आहे? यावर बरेच अवलंबून असते. वास्तविक आजी 9.30 पर्यंत सर्व मालिका पाहून झोपी जात असे. परंतु ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका सुरू झाल्यावर ती न चुकता पाहते. त्यातून मला खूप विश्वास मिळाला, असे ती म्हणाली.

अभिनयच करेन या मतावर कलाकाराने ठाम राहू नये

ती पुढे म्हणाली, मला घनःशाम सुंदरा हे गीत म्हणायचे होते. त्याच्या ओळी मी इंग्रजीमध्ये लिहून घेत होते. त्यात अरुणोदय या शब्दाला य च्या पुढे a जोडला होता. त्यामुळे अर्थ बदलला. आणि स्टेजवर सर्वांनाच हसे फुटले. अर्थात जी घरगुती कामे आहेत ती मला नक्की येतात. कारण तुमच्याकडे कोणती भूमिका येईल, हे सांगता येत नाही. अभिनयच करेन या मतावर कलाकाराने ठाम राहू नये. भूमिकेसाठी कधी नृत्य, गायन, जलतरण, वाहन चालविणे, गडकिल्ले चढणे, घोडे सवारी करणे अशी अनेक कामे भूमिका तुमच्याकडून मागते. तेंव्हा हे सर्व थोडेबहुत तरी तुम्हाला यावे लागते. इतकेच नव्हे तर क्रीडा क्षेत्रावर एखादी मालिका, नाटक व चित्रपटही येतो. त्यामुळे तुम्हाला खेळही माहिती असावे लागतात. यासाठी तुमचे वाचन हवे, असे सायली म्हणते.

प्रत्यक्षात अभिनय करताना मी घाबरले होते. प्रियदर्शनच्या अभिनयाचे टेन्शन आले होते. परंतु घाबरून काही होणार नाही, हे लक्षात आले आणि सहज वावर सुरू केला. सर्वच ज्ये÷ कलाकारांनी सांभाळून घेतले. प्रियदर्शनचे टायमिंग हे खरे तर शिकण्याजोगे आहे, असेही ती म्हणाली. मालिकेतील मालूचा स्वभाव किंवा वैशिष्टय़े सायलीमध्ये आहेत का? या प्रश्नाला दाद देत ती म्हणाली, मालूसारखे खाली मान घालून सर्व काही सहन करणे सायलीला अशक्मय आहे. मात्र तिच्यासारखे सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती सायलीमध्ये नक्कीच आहे.

एकूणच चित्रपट आणि रंगभूमी झपाटय़ाने बदलत आहे. अशावेळी स्पर्धेत टिकाव लागणे किंवा तग धरून राहणे कठीण आहे, असे तुला वाटत नाही का? या प्रश्नावर सहमती दर्शवत ती म्हणाली, काम असो किंवा नसो कॉम्प्लेक्स म्हणजेच अपराधीपण किंवा न्यूनगंड येऊ देऊ नका. एका क्षणी हे सर्व खूप त्रासदायक वाटते. परंतु ते क्षेत्र सोडताही येत नाही. अशावेळी जेंव्हा काम नसेल तेंव्हा पर्याय तयार ठेवणे महत्त्वाचे. म्हणूनच अभिनयाबरोबरच दोन्ही नाटय़ संस्थांमध्ये मी काम करते. कार्यशाळा घेते, एकूणच स्वतःला गुंतवून ठेवणे व आपले काम प्रामाणिकपणे करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, असे ती सांगून गेली.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!