|Saturday, July 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

प्रतिनिधी / बेळगाव

कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱयांना तातडीने नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रोजंदारी कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. ग्राम पंचायत, आरोग्य खाते, हेस्कॉम, पाणी पुरवठा मंडळ यासह इतर विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही काम करत आहोत. तेव्हा आम्हाला तातडीने नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

जिह्यातील सर्वच तालुक्मयांतील विविध कार्यालयांमधील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आम्हाला सरकारने विविध खात्यांमध्ये सामावून घेतले आहे. आम्ही इतर नोकरदारप्रमाणेच काम करत आहे. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. पण आम्हाला अद्याप सरकारी वेतन दिले जात नाही. मात्र कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा पगार दिला जात आहे. तेव्हा हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय होत असून तातडीने आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आम्हाला देण्यात येणारे वेतन वेळेत दिले जात नाही. कंत्राटदार केवळ निम्मेच वेतन देत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. तेव्हा कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेऊन सर्व सरकारी योजना लागू कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश खातरकी, सुगावी एस. एल., इराप्पा अंगडी, इराप्पा सनदी, आय. एच. अत्तार, ए. ए. पटेल, सनदी, जिनराल यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.   

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!