|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रामायण संग्रहालय : योगींकडून भूखंड

रामायण संग्रहालय : योगींकडून भूखंड 

154 कोटी रुपयांचा येणार खर्च : केंद्र सरकारची योजना

वृत्तसंस्था / अयोध्या

अयोध्येत राम मंदिर प्रकरणी न्यायालयाबाहेर तडजोडीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण टिप्पणीदरम्यान रामायण संग्रहालयाबाबत देखील मोठे वृत्त समोर आले आहे.  सूत्रानुसार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामायण संग्रहालय योजनेला आपली मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली होती, परंतु राज्यातील तत्कालीन अखिलेश सरकारने या योजनेवरील कामाला वेग दिला नव्हता. आता राज्यातील भाजप सरकारने यासाठी भूखंड वितरित करण्याची घोषणा केली आहे.

आदित्यनाथ यांनी या प्रकल्पासाठी 25 एकरचा भूखंड देण्याचा शब्द केंद्राला दिला आहे. या प्रकल्पासाठी 154 कोटी रुपयांचा खर्च येणार असून अखिलेश सरकारने जमीनवाटप करण्यास दिरंगाई दाखविली होती. या संग्रहालयाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. राज्यातील सत्ता बदलताच यावर काम सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील आठवडय़ापासूनच यावर काम सुरू होऊ शकते.

मनमोहक व्यवस्था

? लेजर आधारित ऑडिओ-व्हिडिओ प्रणालीद्वारे रामायणाबाबत नागरिकांना माहिती दिली जाईल.

? मोठय़ा पडद्यावर रामायणाचे श्लोक दाखविले जातील.वॉटर स्क्रीन प्रोजेक्शनची देखील असणार व्यवस्था.

?          पर्यटकांच्या सुविधेसाठी कॅफे आणि माहिती केंद्राची स्थापना होईल आणि यात वाय-फायचीही सोय असेल.

मर्यादा पुरुषोत्तमाच्या जीवनाचे दर्शन

संग्रहालयात भगवान रामांचा जीवनपट दाखविणारी 10 दालने असणार आहेत

राम दरबार : परिसराच्या मध्ये 4 मजली इमारतीत राम दरबार बनविला जाईल. यावर राम ध्वज देखील असेल.

बालजीवन : यात ताडकाचा वध आणि अहिल्याचा उद्धार दाखविला जाईल.

अयोध्यापट : येथील भवनात येथे रामांना वनवासाला दाखविले जाईल.

याशिवाय लंका आणि लवकुश यांच्याविषयीचे भाग दाखविण्यासाठॅ वेगवेगळी दालने असतील.

Related posts: