|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » ब्रिटनमधून कार आयातीत 11 पटीने वृद्धी

ब्रिटनमधून कार आयातीत 11 पटीने वृद्धी 

जग्वार, लॅन्ड रोव्हरला सर्वाधिक मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ब्रिटनमधून भारतात कार निर्यात करण्याच्या प्रमाणात गेल्या 7 वर्षांत 11 पटीने वाढ झाली आहे. टाटा मोटर्सची मालकी असणाऱया जग्वार, लॅन्ड रोव्हरला सर्वाधिक मागणी भारतीय ग्राहकांकडून करण्यात येत आहे असे ग्रेट ब्रिटनच्या सोसायटी ऑफ मोटार मॅन्यूफॅक्चर्स ऍन्ड ट्रेडर्सने म्हटले आहे.

भारतातून ग्रेट ब्रिटनला निर्यात करण्यात येणाऱया गाडय़ांमध्ये एका वर्षात 12 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. गेल्या वर्षात ब्रिटनला 31,535 नवीन भारतीय बनावटीच्या कारची नोंदणी करण्यात आली आहे. 2015 च्या तुलनेत या आकडेवारीत 12.6 टक्क्यांनी वाढ झाली. 2009 मध्ये ब्रिटनमधून भारतात केवळ 309 कारची आयात करण्यात आली होती. 2017 मध्ये ही आकडेवारी 3,372 वर पोहोचली. 2015 च्या तुलनेत गेल्या वर्षी मागणीमध्ये 15.8 टक्क्यांनी वाढ झाली. आशियाई क्षेत्रात निर्यातीच्या बाबतीत भारत 10 व्या स्थानावरून 8 व्या स्थानी पोहोचले आहे. भारतात डिस्कव्हरी स्पोर्ट, रेन्ज रोव्हर एवोक, जग्वार एक्सएफ, जग्वार एक्सई आणि जग्वार एफ-पेस या मॉडेल्सना सर्वाधिक पसंती आहे.

आशियाई देशांत आयात कर मोठय़ा प्रमाणात आकारला जात असतानाही प्रीमियम प्रकारातील कारची मागणी गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. भारतीय कार बाजारपेठ पुढील पाच वर्षात प्रतिवर्षी 15 टक्क्यांनी वाढेल. युरोप, अमेरिकेनंतर निर्यातीच्या बाबतीत आशियात तिसऱया क्रमांकाची बाजारपेठ आहे. आशियाई देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने प्रीमियम कारची मागणी वाढत आहे, असे अहवालात म्हणण्यात आले. ब्रिटनमध्ये 2015 च्या तुलनेत कार उत्पादनात 8.5 टक्यांनी वाढ होत 17,22,698 वाहनांचे उत्पादन घेण्यात आले.  याचप्रमाणे निर्यात 10.3 टक्क्यांनी वाढत 13,54,216 वर पोहोचली.

Related posts: