|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रीत करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जि. प. सदस्या सौ. शिल्पा खोत यांनी केले. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व अतिजोखमीच्या गरोदर मातांची तपासणी शिबराप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पं. स. सभापती सौ.  कमल पाटील, पं. स. सदस्य जोती मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पं. स. सभापती सौ. कमल पाटील यांनी केंद्रातील अडीअडचणी सोडवून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पं. स. सदस्य जोती मुसळे यांनी अधिकाऱयांनी ग्रामीण भागात अधिक लक्ष देवून लोकाभिमुख शिबिरे घ्यावीत, अशा सूचना केल्या.

ज्येष्ठ नागरिकांची तपासणी डॉ. अमोल पाटील यांनी केली. 74 गरोदर मातांची तपासणी करुन त्यातील दहा अतिजोखमीच्या गरोदर मातांना विशेष औषधोपचार देवून सर्वांना मार्गदर्शन करणेत आले. ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी करुन अति रक्तदाब, शुगर तपासणी व ईसीजी करुन ज्येष्ट नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये 92 टक्के नागरिकांची तपासणी करण्यात आली.  यावेळी कागल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजयकुमार गवळी यांनी               कार्यक्रमाचा उद्देश व केंद्रातील कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात गरीब महिलांना, रुग्णांना प्रमुख महिला, पदाधिकारी यांच्या हस्ते साडीवाटप करण्यात आले. याचबरोबर जागतिक क्षयरोग कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती फेरी काढली. उपस्थित ज्येष्ठ नागरिक व गरोदर माताना सामाजिक कार्यकर्ते बस्तू शॉवेर रॉडीक्स यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विस्तार अधिकारी महाबरी, एम. जी. वड्ड, एकनाथ पाटील, गौरी खैरमोडे, श्रीमती एस. पी. भोई, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. स्वामी समर्थ लॅबकडून रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.  स्वागत वैद्यकीय अधिकारी पराग खरबुडे यांनी केले. प्रास्ताविक केंद्राचे आरोग्य सहाय्यक एस. आर. पाटील यांनी केले. आभार एस. आर. माने यांनी मानले.