|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » leadingnews » आजपासून निवासी डॉक्टर कामावर रूजू

आजपासून निवासी डॉक्टर कामावर रूजू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉक्टरांच्या मरहाणिविरोधात सुरू असलेल्या मार्डचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आंदोलन मागे घशत असल्याचे प्रतिज्ञापत्र मार्डने काल हायकोर्टात सादर केले होते. आज शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर कामावर रूजू होणार आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या  मार्डचे आंदोलन संपुष्टात आले आहे.

सकाळी 8 वाजता सगळय़ा डॉक्टरांनी कामावर हजर व्हा अन्यथा सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा शुक्रवारी हायकोर्टाने मार्डच्या डॉक्टरांना दिला होता. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्र मार्डने डॉक्टरांना सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचे म्हटले होते. जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार किंवा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करू शकते, असेही मार्डने मान्य केले आहे.मार्डच्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टाने डॉक्टरांना फटकारले होते. त्यानंतर संपकर डॉक्टरांचा अडेलतटूटपणा कमी झाला आहे.

 

Related posts: