|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

बुधाचे राश्यांतर आपल्या मनावरचे दडपण कमी करणार आहे. व्यवहारात मदत करणारी माणसे भेटतील. अडलेली कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत सोमवार, मंगळवार सहकारी वरि÷ यांच्याबरोबर शाब्दिक वाद घालू नका. गैरसमज वाढतील. इच्छा नसली तरी काही कामांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कला क्रीडा क्षेत्रात अपयश आले तरी जिद्द ठेवल्यास मोठी झेप घेता येईल. विद्यार्थीवर्गाने परिक्षेच्या काळात अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे.


वृषभ

अविचाराने निर्णय घेतल्यास धंद्यात नुकसान होईल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकारणात समाजकार्यात आपली प्रगती होईल. मात्र लोक आपल्या यशावर जळतील त्याचा थोडाफार त्रास होईल. आध्यात्मिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा. गुरुवार, शुक्रवार प्रकृतीची काळजी घ्या. एखादी साथ, सर्दी, ताप याचा त्रास संभवतो. शेतीच्या कामात यश मिळेल. महिलांनी घरगुती कामात काळजी घ्यावी.


मिथुन

 आपल्या कामात नियमितपणा ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे गैरसमज कमी होतील. वैवाहिक जीवनात सामंजस्यपणा दाखवला नाही तर काही टोकाच्या भूमिकेला सामोरे जावे लागेल. जीवनसाथीची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात अनुभवी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. विद्यार्थी वर्गाने जास्त परिश्रम घेण्याची गरज आहे. तरच विजयश्री खेचून आणता येईल. प्रवासाचे बेत आखले जातील.


कर्क

कमी खर्चात घर कसे चालवायचे याचा अनुभव येईल. थोडे संकट जरी आपल्यावर आले असले तरी सामोपचाराने निर्णय घेतल्या प्रगतीरथ कुठेही थांबणार नाही. शेतकरीवर्गाने पिकांच्याकडे जास्त लक्ष द्यावे. व्यवहारात बुधवार, गुरुवार यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या मदतीची गरज इतरांना वाटेल. कोर्टकेसमध्ये सावध भूमिका घ्या.


सिंह

बुध राश्यंतराने पदाधिकार वाढण्याची संधी मिळेल. कुटुंबात जीवनसाथी व मुले यांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. खर्च वाढेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोणताही वाद असल्यास लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक क्षेत्रात मनाप्रमाणे यश मिळेल. इंजिनिअर, डॉक्टर यांना नवीन संधी मिळेल. वाहन जपून चालवा.


कन्या

रविवार, सोमवार अडचणी वाढण्याची शक्मयता सामाजिक कार्यात आहे. धंद्यात  बुध राश्यांतराने तांत्रिक बिघाड संभवतो. त्यामुळे मोठी कामे रेंगाळत पडू शकतात. कायद्याच्या कचाटय़ात अडकू शकता. कामात वाद गैरसमज संभवतात. अनाठायी पैसा खर्च होऊ शकतो, काळजी घ्या. कोर्ट केसमध्ये तुमच्यावर वेगळय़ाच प्रकारचा आळा येण्याचा संभव आहे.


तुळ

बुधाचे राश्यांतर व्यवसायात नोकरीत किरकोळ वाद व समस्या निर्माण करण्याची शक्मयता आहे. भलत्याच माणसावर एकदम विश्वास ठेऊ नका. खरेदी विक्रीत सावध रहा. राजकीय- सामाजिक कार्यात तुमच्याशी स्पर्धकासारखे वागणारे लोक सहवासात येतील. तुमचे खरे प्रेम समोरच्या व्यक्तीला कळणे महत्त्वाचे असते.


वृश्चिक

गुढीपाडवा उत्साहात व आनंदात साजरा कराल. त्यानंतर निर्णय घेताना मात्र उतावळेपणा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय सामाजिक कार्यात तुमच्यावर आरोप येतील. तर काही लोक तुमची स्तुती करतील. संसारात चांगली घटना घडू शकते. परिक्षेत यश मिळेल. वाहन जपून चालवा.


धनु

काही घटना अशा घडतील की तुमचा आत्मविश्वास व तुमचा अंदाज खरा ठरेल. बुधाचे राश्यांतर होत आहे. मान-सन्मानाचा योग येईल. तुमचे बोलणे कुणाला तरी नकोसे वाटेल. तुमची चूक नसताना सुद्धा गैरसमज करून घेतला जाईल. गुढी पाडव्याच्या दिवशी एखादे दडपण राहील. नवा विचार प्रेरणादायी ठरेल.


मकर

 बुधाचे राश्यांतर व्यवसायिकदृष्टय़ा फायदेशीर ठरेल. व्यवहारिक दृष्टिकोन  ठेवा. गुढी पाडव्याला नव्या कार्याची सुरुवात  करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला उजाळा देता येईल. कौटुंबिक समस्या कमी होतील. खरेदी, विक्रीत फायदा होईल. कोर्टकेसची परिस्थिती आशादायक राहील. सप्ताहाच्या शेवटी रागावर लगाम ठेवा.


कुंभ

 अडचणीत आलेली कामे पूर्ण करण्याचा उत्साह व आत्मविश्वास तुमच्यात येईल. कठीण प्रसंगावर प्रयत्नाने वरचढ राहू शकाल. संसारात शुभ समाचार मिळेल. घर, वाहन, जमीन इ. मोठी खरेदी होईल. सावधपणे रहा. राजकीय क्षेत्रात तुमच्याकडे वरि÷ वेगळय़ाच प्रकारची धुरा सोपवतील. कला क्रीडा क्षेत्रात चमकाल. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल.


मीन

मागील गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या दिशेने जाण्याची उर्जा तुम्हाला मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे पाऊल नक्कीच पडेल. गुप्तकारवायांचा अभ्यास चालूच ठेवा. म्हणजे अडचणी कमी होतील. धंद्यात जम बसेल. शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाल. प्रेमाला चालना मिळेल.

Related posts: