|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सीपीआर चौकात पुन्हा ‘माणुसकीची भिंत’

सीपीआर चौकात पुन्हा ‘माणुसकीची भिंत’ 

जुने कपडे देण्यासाठी अन् कपडे घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माणूसकीच्या भिंती व्हॉटस अप ग्रुप यांच्या प्रयत्नातून साकारलेली माणुसकीची भिंती गुढी पाडव्याच्या पुर्व संध्येला पुन्हा एखदा सीपीआर चौकात उभा करण्यात आली आहे. रविवार 26 रोजी सकाळी साडे नऊ वाजता महापौर हसिना फरास यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, उपमहापौर अर्जून माने, गटनेता प्रविण केसरकर, गणी आजरेकर आदी प्रमुख उपस्थित होते. 

गेल्या दिवाळीला चार दिवस माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी शहरासह जिल्हय़ातील तीन हजारहून अधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. तसेच दोन लाखहून अधिक होतकरु नागरिकांनी या माणसुकीचा भिंताच लाभ घेतला होता. यावेळी नागरीकांचा मिळालेला उंदड प्रतिसाद पाहता, ही भिंत गुढी पाडव्याला पुन्हा उभी करण्याचे आमदार पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार 26 व 27 मार्च रोजी ही माणूसकीची भिंत समाजातील गोर-गरीब जनतेसाठी खुली राहणार आहे. रविवारी सकाळी सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये दुपार पर्यंत समाजातील दिडशेहून अधिक नागरीकांनी माणसुकीच्या भिंतीला भेट देवुन कपडे दान केली. 

 सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱया कोल्हापुरात, समाजातील गरजू आणि उपेक्षित घटकांना मदत करणाऱयांची संख्या मोठी आहे. गतवर्षी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरीकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता. यंदाही गुडीपाडव्याच्या पुर्वसंध्येला पुन्हा ही माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. समाजातील दानशुर व्यक्तींनी या उपक्रमासाठी इतरांना वापरता येतील असे कपडे दान करावेत. तसेच समाजातील जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीच्यावतीने सुधर्म वाझे, प्रसाद पाटील, अमर पाटील, शिवाजी पाटील, मोहन सालपे,  सुरज पाटील, गणी आजरेकर, सचिन पाटील यांनी केले आहे.

 

Related posts: